Breaking News
Loading...
Tuesday, 20 April 2010

Info Post
खूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकला
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला
तुझ्याशी बोलताना वाटलं, एकटेपणा संपला!

तोच आवाज, तिच वाक्य, तिच बोलण्याची शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली थैली,
वाटलं असंच तु बोलत रहावंस,
माझ्या कानांत गोड हसत रहावंस!

तुलाही कदाचित वाटलं असेल
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची ईच्छा मनी नक्कीच असेल!

वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या क्षणांची,
का देऊ मी उपमा याला इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!

इच्छा झाली होती काहीतरी विचारायची,
तुलाही आवड होती काहीतरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड नव्हती अग्निपरीक्षेची!!

0 comments:

Post a Comment