Breaking News
Loading...
Friday, 3 September 2010

Info Post
हृदय आज खूप दुखतय रे..
वेदनेनी मी खरच खूप तळमळतेय रे..

एक वेळा तरी लक्ष दे माझ्याकडे..
ही अपेक्षा मी आता पण ठेवतेय रे..

कोणी म्हणती मला मी मूर्ख आहे..
कोणी म्हणती मला डोकच नाही..

त्यांना नाही कळत ते..
तू तरी एक वेळ समजून घे रे..

तुझी वाट बघत मी जगतेय रे..
वाटेतले काटे मला खूप रूततात रे..

येऊन एक वेळ दाखव माझी वाट..
ही इच्छा  तुझ्याजवळ व्यक्त करतेय रे..

बोलायच आहे मला खूप काही..
पण तुला आणि वेळेला मी घाबरतेय  रे..

आता तरी तू समजून घे माझा त्रास..
या जगात तुज विन खूप एकटी आहे रे..

साभार - कवीयेत्री - रूचि



0 comments:

Post a Comment